Breaking
12 May 2026, Tue

मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र; जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा, आंदोलनाला बळ

image_pdfई-पेपर PDF डाउनलोडimage_printप्रिंट

मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र;

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा

झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक जोमाने सुरू ठेवले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम असून, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत आहे.

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांची भेट; आंदोलनाला बळ


महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रासकर एस. के. यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
👉 “आंदोलनातील मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणे आवश्यक आहे. माझा पूर्ण पाठिंबा तुमच्यासोबत आहे.”
👉 “आंदोलन अधिक सक्रिय ठेवून एकजुटीने लढा द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.

📣 मुधोजी महाविद्यालयाचा जिल्ह्यात ठळक संघर्ष

रासकर एस. के. यांनी पुढे सांगितले की, सातारा जिल्ह्यात मुधोजी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असून, जे या आंदोलनाची खिंड सक्षमपणे लढवत आहे.
👉 “हे आंदोलन जिल्ह्यातील सर्वात प्रभावी व ताकदीचे ठरत असून, कर्मचाऱ्यांनी उभारलेला संघर्ष उल्लेखनीय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

🏅 जिल्हास्तरीय नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका


रासकर यांनी महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व इतर राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्वाला जिल्हास्तरीय जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
👉 “मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्व सक्षम असून, त्यांना जिल्हाध्यक्षपदासारखी जबाबदारी दिल्यास जिल्हास्तरीय संघटनात्मक काम अधिक जोमाने उभे राहू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
👉 तसेच, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, अमरसिंह घोरपडे, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे,  आशालता बनकर, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार, पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी, अनिल वाजे, लहू चव्हाण, दीपक रणदिवे, पांडुरंग चव्हाण, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

📍 ठिय्या आंदोलन कायम; निर्धार अधिक ठाम

महाविद्यालयाच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून, “मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही” हा निर्धार कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

⚠️ शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

या संपामुळे महाविद्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)

📰 झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी
📅 दिनांक: 24 एप्रिल 2026

📢 झुंजार भारत | अधिकृत WhatsApp Channel
👉 Channel Join करा
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📢 WhatsApp Channel Join