Breaking
24 Aug 2026, Mon

म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न

image_pdfई-पेपर PDF डाउनलोडimage_printप्रिंट

म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न


डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

म्हसवड : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत **भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानवृद्धी व्हावी तसेच ग्रंथालयाचे शैक्षणिक जीवनातील महत्त्व अधोरेखित व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. व्ही. सी. काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही प्राचार्य डॉ. काकडे होते. यावेळी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेश कुमार सोनवणे यांनी ग्रंथालयाचे महत्त्व, वाचन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये ग्रंथांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एम. एस. शिंगाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व नेटके आयोजन केले. प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ, साहित्यिक व शैक्षणिक ग्रंथ तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस उपयुक्त असलेल्या विविध ग्रंथांचे आकर्षक पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या प्रदर्शनास भेट देऊन विविध ग्रंथांची माहिती घेतली.

या कार्यक्रमास IQAC समन्वयक तथा इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रणवरे डी. जे., बॉटनी विभागप्रमुख डॉ. सुजित जाधव, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेश कुमार सोनवणे, भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. बी. टिळेकर, इंग्रजी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सरक ब्रह्मदेव गणपती, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक काळेल के. पी., राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. पवार आर. जी., ग्रंथालय कर्मचारी आडगळे राजेंद्र किसन, फिजिकल डायरेक्टर बापू कोळेकर, बोडरे अविनाश तसेच कॉमर्स विभागातील विद्यार्थी यश माने यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला शास्त्रीय व आधुनिक दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये ‘वाचाल तर वाचाल’ या विचाराला चालना मिळण्याबरोबरच नियमित वाचनाची सवय आणि ज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन विकसित करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
उत्साहपूर्ण वातावरणात हा ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

📢 झुंजार भारत | अधिकृत WhatsApp Channel
👉 Channel Join करा
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📢 WhatsApp Channel Join