Breaking
16 Jul 2026, Thu

कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

image_pdfई-पेपर PDF डाउनलोडimage_printप्रिंट

कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालयात सत्कार; कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


              फलटण (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व कार्यक्षम सेवा बजावून प्रशासकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे तथा सध्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेले आदरणीय आर. वाय. गायकवाड यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

         

 

 

 

      ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय स्थान निर्माण करणारे आर. वाय. गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात शिस्त, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि सेवाभाव यांचा आदर्श ठेवला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

                    सध्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने, प्रेमळ व विश्वासपूर्ण संवादशैलीने सर्व कर्मचारी, विद्यार्थी व सहकाऱ्यांची मने जिंकली आहेत. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, सकारात्मक दृष्टीकोन आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती यामुळे ते महाविद्यालयात विशेष लोकप्रिय आहेत.

         वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत आदरणीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आर. वाय. गायकवाड यांचा शाल, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेला गौरवाची मानवंदना अर्पण केली.


         त्यानंतर मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर सेवाकार्याच्या शुभेच्छा दिल्या.

              यावेळी धनंजयराव गाडगीळ कॉलेज होस्टेलच्या समस्त मित्रमंडळींकडूनही गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. संघर्षातून घडलेले त्यांचे कर्तृत्व, यशाच्या शिखरावर पोहोचूनही जपलेला साधेपणा, मित्रांप्रती असलेली आत्मीयता आणि माणुसकीची जपणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असल्याची भावना मित्रपरिवाराने व्यक्त केली.

                    कर्तृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेले आर. वाय. गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या अनुभवाचा प्रकाश समाजाला आणि शैक्षणिक क्षेत्राला पुढील काळातही दिशा देत राहो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)

📢 झुंजार भारत | अधिकृत WhatsApp Channel
👉 Channel Join करा
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📢 WhatsApp Channel Join