“मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच” – दिलीप कुमरे

✊ “हा न्याय हक्काचा लढा आहे” – दिलीप कुमरे
मुधोजी महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी संघटनेचे युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांनी आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की,
“कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा असून, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.”
पुढे त्यांनी सांगितले की,
“उद्या शासनाकडून अधिकृत इतिवृत्त प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर समन्वय समितीची बैठक होऊन पुढील भूमिका निश्चित केली जाईल.”
“सद्यस्थितीत संप सुरूच राहणार असून, उद्या 23 एप्रिल रोजी हा संप एकजुटीने यशस्वी करायचा आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला आहे. महाविद्यालयाच्या गेटसमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम ठेवण्यात आले.
📍 ठिय्या आंदोलन कायम; एकजुटीचा निर्धार
महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
⚠️ उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने उद्या होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)


