म्हसवड महाविद्यालयात अँटी रॅगिंग भित्तिपत्रकाचे दिमाखात अनावरण

म्हसवड महाविद्यालयात अँटी रॅगिंग भित्तिपत्रकाचे दिमाखात अनावरण


📍 म्हसवड | दि. २२ सप्टेंबर २०२६
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे अँटी रॅगिंग जनजागृती भित्तिपत्रकाचे उत्साहात अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अँटी रॅगिंग कमिटीचे चेअरमन डॉ. विकास काकडे होते.
यावेळी श्रीमंत हिंदमालादेवी विजयसिंह राजेमाने (मा. नगरसेविका, म्हसवड नगरपरिषद) यांच्या हस्ते मराठी, तर प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनिषा बाबर यांच्या हस्ते इंग्रजी अँटी रॅगिंग भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी रॅगिंग हा गंभीर गुन्हा असून विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे आणि कोणतीही घटना घडल्यास निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमास अँटी रॅगिंग कमिटीच्या को-ऑर्डिनेटर डॉ. प्रज्ञा माने, सदस्य प्रा. आर. जे. पवार व प्रा. अंजली माने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛡️ रॅगिंगमुक्त परिसर – सुरक्षित विद्यार्थीदशा!
📰 साप्ताहिक झुंजार भारत
निर्भीड लेखणी… जनतेच्या प्रश्नांसाठी!




मुधोजी महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुधोजी महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न


फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. भाग-३, सेमिस्टर-६ रसायनशास्त्राच्या NEP-2020 सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या प्रायोजकत्वाखाली करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मुधोजी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे प्रमुख माननीय प्रा. (डॉ.) आर. व्ही. गुरव उपस्थित होते. तसेच प्रा. (डॉ.) आर. के. माने, I/C, BOS अध्यक्ष व रसायनशास्त्र विभागप्रमुख, के.आर.बी.पी. महाविद्यालय, इस्लामपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. IQAC समन्वयक प्रा. (डॉ.) टी. पी. शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. (डॉ.) ए. पी. आचार्य, संयोजक व रसायनशास्त्र विभागप्रमुख यांनी करून दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) आर. व्ही. गुरव यांनी NEP-2020 अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अध्यापन-अधिगम प्रक्रियेत अपेक्षित सकारात्मक बदल, तसेच उच्च शिक्षणातील विद्यार्थी-केंद्रित, बहुविषयक, कौशल्याधारित, क्षमता-विकासात्मक व परिणामाधारित दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना NEP-2020 मधील मूलभूत तत्त्वांचा अभ्यासक्रमरचनेत प्रभावीपणे समावेश करून उच्च शिक्षणाची गुणवत्ता, उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यशाळेत सेंद्रिय, असेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र या विषयांवर स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले. सेंद्रिय रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) एस. एम. खोत, असेंद्रिय रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) एस. एच. बुगले आणि भौतिक रसायनशास्त्रासाठी प्रा. (डॉ.) ए. आर. सुपले यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम (SEC) आणि क्षेत्रीय प्रकल्प (FP) यावर मार्गदर्शन व चर्चा झाली. प्रा. (डॉ.) जी. एच. निकम यांनी IKS विषयावर मार्गदर्शन केले, तर SEC व FP संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेच्या समारोप सत्रात सहभागी प्राध्यापकांचा अभिप्राय घेण्यात आला व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते. डॉ. एम. पी. पाटील यांनी आभार मानले, तर श्रीमती जे. एस. काळेल व डॉ. चव्हाण मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांतील सुमारे १०० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुधोजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. NEP-2020 अंतर्गत रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरली, असा सूर सहभागी प्राध्यापकांनी व्यक्त केला.

 

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




वनमहोत्सवानिमित्त महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे वृक्षारोपण

वनमहोत्सवानिमित्त महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे वृक्षारोपण

महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करताना महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. विकास काकडे व प्राध्यापक – प्राध्यापिका

म्हसवड, प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘वन महोत्सव’ निमित्त १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत महाविद्यालय परिसर तसेच दत्तक गाव मौजे भाटकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मौजे भाटकी येथे वृक्षारोपण करताना पोलीस पाटील मा. सौ. हर्षदा शिर्के, मा.सौ. ज्योती शिर्के व प्राध्यापक -प्राध्यापिका
– ~~~~~~~~~~~~~~

वनमहोत्सव सप्ताहांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाविद्यालय परिसर व मौजे भाटकी येथे विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि हरित परिसर निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.


या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वाय. वाय. दुबाले, प्रा. ए. एम. लांब, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एम. मोरे, प्रा. के. सी. वाघमारे तसेच सदस्या डॉ. पी. ए. माने यांनी विशेष परिश्रम घेतले.


यावेळी  पोलीस पाटील मा. सौ. हर्षदा शिर्के, मा.सौ. ज्योती शिर्के व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.




कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कर्तृत्ववान प्रशासक आर. वाय. गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालयात सत्कार; कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


              फलटण (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व कार्यक्षम सेवा बजावून प्रशासकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे तथा सध्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेले आदरणीय आर. वाय. गायकवाड यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

         

 

 

 

      ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय स्थान निर्माण करणारे आर. वाय. गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात शिस्त, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि सेवाभाव यांचा आदर्श ठेवला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

                    सध्या मुधोजी महाविद्यालयात  रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने, प्रेमळ व विश्वासपूर्ण संवादशैलीने सर्व कर्मचारी, विद्यार्थी व सहकाऱ्यांची मने जिंकली आहेत. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, सकारात्मक दृष्टीकोन आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती यामुळे ते महाविद्यालयात विशेष लोकप्रिय आहेत.

         वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत आदरणीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आर. वाय. गायकवाड यांचा शाल, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेला गौरवाची मानवंदना अर्पण केली.


         त्यानंतर मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर सेवाकार्याच्या शुभेच्छा दिल्या.

              यावेळी धनंजयराव गाडगीळ कॉलेज होस्टेलच्या समस्त मित्रमंडळींकडूनही गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. संघर्षातून घडलेले त्यांचे कर्तृत्व, यशाच्या शिखरावर पोहोचूनही जपलेला साधेपणा, मित्रांप्रती असलेली आत्मीयता आणि माणुसकीची जपणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असल्याची भावना मित्रपरिवाराने व्यक्त केली.

                    कर्तृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेले आर. वाय. गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या अनुभवाचा प्रकाश समाजाला आणि शैक्षणिक क्षेत्राला पुढील काळातही दिशा देत राहो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




दानात श्रेष्ठ दान – नेत्रदान : डॉ. महेशकुमार सोनावणे

दानात श्रेष्ठ दान – नेत्रदान : डॉ. महेशकुमार सोनावणे


म्हसवड, दि. १५ (झुंजार भारत प्रतिनिधी) – अन्नदान, रक्तदान, भूमिदान यांसारखी अनेक समाजोपयोगी दाने समाजात होत असली तरी नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दृष्टी नसल्यास विश्वातील सौंदर्याचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची संकल्पना समाजात अधिकाधिक रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १० व ११ जून रोजी आयोजित नेत्रदान दिन व नेत्रदान जनजागृती अभियान शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.


या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी व डॉ. सुप्रिया विरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नेत्रचिकित्सक अधिकारी कु. प्रज्ञा क्षीरसागर यांनी उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदान दिनाची पार्श्वभूमी तसेच मरणोत्तर नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांतर्गत आयोजित नेत्रतपासणी शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश दुबाले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल लांब तसेच प्रा. करण वाघमारे, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. राजेंद्र पवार, प्रा. डॉ. प्रज्ञा माने आणि प्रा. अंजली माने यांनी विशेष सहकार्य केले.


शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


■ नेत्रदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

       मोहिते वडगांव, ता. कडेगाव, जि. सांगली (दि. २० मे २०२६) : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु. येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मोहिते वडगांव येथे मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जनजागृती केली.


हा उपक्रम बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी श्री. हणमंतराव (आप्पा) मोहिते यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये कृषिदूत मयूर, अनुज, विघ्नहर, कुणाल, सुशांत, तुषार, प्रविण व रणजित यांनी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीने मातीचे नमुने कसे घ्यावेत याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माती नमुना संकलनासाठी लागणारी साधने, नमुना घेताना घ्यावयाची काळजी आणि नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजण्यास मदत होते, अशी माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास श्री. जयवंत मोहिते, सौ. भाग्यश्री मोहिते, सौ. शिलावती मोहिते, श्री. दत्तात्रय मोहिते, श्री. ब्रह्मदेव सरक, श्री. महादेव मिसाळ, श्री. वसंत काळे, श्री. सदाशिव कुंभार, श्री. पांडुरंग मिसाळ आणि श्री. रामचंद्र मिसाळ आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यात नियमितपणे मृदा परीक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांनी शास्त्राधारित शेती तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचवून शेतकरी व विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.




श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ‘ एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ‘कार्यशाळेचे आयोजन


म्हसवड :येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी व्यवसायाभिमुख विशेष उपक्रम म्हणून`महिंद्रा प्राइड क्लासरूम ‘ व ‘महिंद्रा ग्रुप ‘संचलित, नांदी फाउंडेशनच्या वतीने आयोजित बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी “एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी ९. ०० ते १.०० या वेळेत सलग सहा दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत ” कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्किल असेसमेंट बोर्ड “, “महिला सबलीकरण कक्ष “, “शिवाजी विद्यापीठ स्किल डेव्हलपमेंट विभाग “व “स्वयंसिध्दा सेंटर “हे विभाग कार्यरत असून प्रोफेशनल सॉफ्ट स्किल्स ट्रेनर मा.कोमल बंडगर या सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यशाळेत समन्वयक म्हणून प्रा. निलोफर तांबोळी, प्रा.डॉ.जयश्री चव्हाण, प्रा. डॉ,प्रज्ञा माने , प्रा.डॉ नितीन भालके,प्रा.डॉ.सुजाता देशमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा.देवेंद्र रणवरे, हे प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शक यांच्यात समन्वय साधणार आहेत, अशी माहिती कार्यशाळा नियोजन समितीतील प्रा.मनीषा सावंत , प्रा. अंजली माने, प्रा. एम एस चव्हाण, प्रा. डॉ. संतोष लाळगे , प्रा.बाबासाहेब मैंद यांनी दिली.

सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर, चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटण माजी नगराध्यक्ष फलटण नगर परिषद फलटणचे मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक- निंबाळकर ,सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे व्हा.चेअरमन मा.श्रीमंत ॲड.पृथ्वीराज राजेमाने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर मा. हेमंत रानडे, प्रशासकीय अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम हे सहकार्य करणार आहेत.

प्रस्तुत कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना कौशल्य करिअर व रोजगाराचा लाभ होणार असून बहुसंख्य विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .संजय दीक्षित यांनी केले आहे .




मुधोजी महाविद्यालयात ३ जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन सिंगापूर व साऊथ कोरिया येथील वैज्ञानिकांचे संशोधनात्मक मार्गदर्शन

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व ‘नॅक’ मानांकन प्राप्त मुधोजीचा क्षण, फलटण येथे शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी “विज्ञान व तंत्रज्ञानाचा उदयोन्मुख क्षितिजे : शाश्वत मार्ग (EHST-2026)” यामुधोजी फलटण – संपूर्ण परिषद

राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या सर्व गुणांचे गुण म्हणजे सिंगापूर व साथ कोरिया या प्रगत राष्ट्रसंशोधक वैज्ञानिक व संशोधक या विधानासाठी उपस्थित असून, त्यांच्या संशोधक मार्गदर्शनाचा लाभार्थी संशोधक, अधिकारी व मानसिकता आहे. उतारा फलटण

यामध्ये तंत्रज्ञान व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन शास्त्रज्ञ, संस्थापक, चर्चा व विद्यार्थी सहभागी होणार असून, विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधुनिक विकास, नवसंस्करण, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या विषयांवर चर्चा करणे होणार आहे.

सदाचे उत्तरे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधानाचे अधिकारी श्रीमंत रामराजे निषेध निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात आले असून, चेअरमन श्रीमंत रनाथघुराजे निंबाळकर व अध्यक्ष सचिव श्रीमंत संजीवे निंबाळकर निंबाळकर विशेष मार्गदर्शन लाभत आहेत. आहे.

या सर्वांचा पूर्णाचार्य प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी सांगितले, “ही परिषद फलटणच्या सर्व शैक्षणिक व संवर्धन क्षेत्रासाठी मैलाचा आणि संशोधक रचना विकासासाठी उपयुक्त ठरेल.” अधिकाधिक संशोधक व पालकनी या पालकांचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

वाचाळ प्राचार्य डॉ. पी. एच. त्यांच्या कुशल धोरणाची तयारी अंतिम परिस्थिती आली असून, आंतरगुणवत्ता नियंत्रण कक्ष (IQAC) समन्वयक डॉ. टी. पी. कृती हे मंडळाचे सचिव म्हणून कार्य पाहत आहेत.

या माध्यमिक विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व संशोधन मान्यतेसाठी पर्यावरण उपस्थित असून, ही परिषद शैक्षणिक व संशोधक क्षेत्राला ओळखली जाणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उमेदवारांच्या उमेदवारांसाठी उमेदवाराचे निमंत्रण प्रा. डॉ. ए. पी. आचार्य व सहनिमंत्रक डॉ. एम. पी. पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण अनुभवीन परिवार परिश्रम घेतला आहे.