मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

मुधोजी महाविद्यालयात नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते. प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब येवले, उपप्राचार्य प्रा. सौ. उर्मिला भोसले, रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड, बारामतीचे नगरसेवक गोरख पारसे, पत्रकार अनिल सावळे पाटील तसेच सत्कारमूर्ती श्री. नवनाथ येवले उपस्थित होते.


यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “संस्थेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी ते फक्त महाविद्यालयातील सेवेतून मुक्त होतात; मात्र संस्थेच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून ते शेवटपर्यंत आमच्यासोबत राहतात.” तसेच त्यांनी येवले कुटुंब प्रतिष्ठित असून ते एकनिष्ठ व कर्तव्यदक्ष असल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवनाथ येवले हे संस्थेवर अपार निष्ठा असलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार देत मुलांना उच्च शिक्षण दिले आहे, ही बाब प्रेरणादायी आहे.

यावेळी बाळासाहेब येवले, अनिल सावळे पाटील, डॉ. ए. एन. शिंदे आणि फातिमा तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करून येवले यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सागर निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. राजू भोसले यांनी मानले.

या सोहळ्यास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत महाविद्यालयाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक नवनाथ येवले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा …

       

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ लिपिक श्री. नवनाथ नारायण येवले हे दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सन्मानार्थ सेवानिवृत्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समारंभ गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणार आहे. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख शुभहस्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प.स. सदस्य श्री. बाळासाहेब नारायण येवले व मा. सरपंच, मुंजवडी यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. पंडितनाथ हरिभाऊ कदम यांचे मार्गदर्शन लाभणार असून, या प्रसंगी सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. नवनाथ येवले यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने काम करत महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे एक अनुभवी व समर्पित कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

 

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र; जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा, आंदोलनाला बळ

मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही तीव्र;

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांचा ठाम पाठिंबा

झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक जोमाने सुरू ठेवले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम असून, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत आहे.

जिल्हा उपाध्यक्ष रासकर एस. के. यांची भेट; आंदोलनाला बळ


महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रासकर एस. के. यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
👉 “आंदोलनातील मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणे आवश्यक आहे. माझा पूर्ण पाठिंबा तुमच्यासोबत आहे.”
👉 “आंदोलन अधिक सक्रिय ठेवून एकजुटीने लढा द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.

📣 मुधोजी महाविद्यालयाचा जिल्ह्यात ठळक संघर्ष

रासकर एस. के. यांनी पुढे सांगितले की, सातारा जिल्ह्यात मुधोजी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असून, जे या आंदोलनाची खिंड सक्षमपणे लढवत आहे.
👉 “हे आंदोलन जिल्ह्यातील सर्वात प्रभावी व ताकदीचे ठरत असून, कर्मचाऱ्यांनी उभारलेला संघर्ष उल्लेखनीय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

🏅 जिल्हास्तरीय नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका


रासकर यांनी महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व इतर राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्वाला जिल्हास्तरीय जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
👉 “मुधोजी महाविद्यालयातील नेतृत्व सक्षम असून, त्यांना जिल्हाध्यक्षपदासारखी जबाबदारी दिल्यास जिल्हास्तरीय संघटनात्मक काम अधिक जोमाने उभे राहू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
👉 तसेच, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, अमरसिंह घोरपडे, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे,  आशालता बनकर, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार, पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी, अनिल वाजे, लहू चव्हाण, दीपक रणदिवे, पांडुरंग चव्हाण, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

📍 ठिय्या आंदोलन कायम; निर्धार अधिक ठाम

महाविद्यालयाच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून, “मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही” हा निर्धार कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

⚠️ शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

या संपामुळे महाविद्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)

📰 झुंजार भारत | फलटण प्रतिनिधी
📅 दिनांक: 24 एप्रिल 2026




“मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवा” – रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांचा ठाम पाठिंबा

“मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवा”

रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांचा ठाम पाठिंबा

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज तिसरा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम ठेवण्यात आले.

रजिस्ट्रार गायकवाड यांचा ठाम पाठिंबा :
मुधोजी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
👉 “कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू ठेवणे गरजेचे आहे.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,
👉 “या आंदोलनाला प्राचार्य संघटना, शिक्षक संघटना व इतर सर्व संघटनांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.”
👉 “सर्व मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. या लढ्यात माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

ठिय्या आंदोलन कायम; एकजुटीची ताकद

  1. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून आभार मानताना कर्मचारी नेते संदीप टिळेकर

मुधोजी महाविद्यालयाच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत असून, “मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच” हा निर्धार अधिक ठाम झाला आहे.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार, पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी, अनिल वाजे, लहू चव्हाण, पांडुरंग चव्हाण, दीपक रणदिवे, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ निर्णयाची प्रतीक्षा कायम
शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची प्रतीक्षा असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही तीव्र; “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच” – दिलीप कुमरे

 “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच” – दिलीप कुमरे

आंदोलनास मार्गदर्शन करताना दिलीप कुमरे

✊ “हा न्याय हक्काचा लढा आहे” – दिलीप कुमरे

मुधोजी महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी संघटनेचे युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांनी आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की,
 “कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा असून, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.”
पुढे त्यांनी सांगितले की,
“उद्या शासनाकडून अधिकृत इतिवृत्त प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर समन्वय समितीची बैठक होऊन पुढील भूमिका निश्चित केली जाईल.”
“सद्यस्थितीत संप सुरूच राहणार असून, उद्या 23 एप्रिल रोजी हा संप एकजुटीने यशस्वी करायचा आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला आहे. महाविद्यालयाच्या गेटसमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आजही कायम ठेवण्यात आले.

📍 ठिय्या आंदोलन कायम; एकजुटीचा निर्धार

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड एकजूट दिसून येत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी


या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने उद्या होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




मुधोजी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा; गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू, बेमुदत संपाचा निर्धार कायम

मुधोजी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा;

नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देताना मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी
नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देताना मुधोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी

गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू, बेमुदत संपाचा निर्धार कायम

महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आज फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी फलटण तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनापुढे मागण्या मांडल्या. तसेच, निवासी नायब तहसीलदार श्री. अभिजीत सोनवणे यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

👉 सदर निवेदन स्वीकारताना निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

🚩 संपा बरोबरच महाविद्यालयाच्या गेटसमोर रोज ठराविक वेळ ठिय्या आंदोलन सुरू

मुधोजी महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी

कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत महाविद्यालयाच्या गेटसमोर ठाण मांडून बसले आहेत.

👉 “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

📢 शासनाच्या दुर्लक्षामुळे संप तीव्र

समन्वय समितीच्या वतीने मागील १५ महिन्यांपासून सातत्याने आंदोलन, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने आणि विधानसभेत मान्य झालेल्या मागण्यांवरही अंमलबजावणी न झाल्यामुळे अखेर २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

🏫 परीक्षा व प्रशासकीय कामकाजावर परिणाम

सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असताना या संपामुळे परीक्षा प्रक्रिया, निकाल, तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवरही त्याचा परिणाम जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

📌 प्रमुख प्रलंबित मागण्या.

कर्मचारी संघटनेने शासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे:

1. ✅ जुनी पेन्शन योजना लागू करावी (१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी)
2. ✅ रिक्त पदे तातडीने भरावीत व चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी उठवावी
3. ✅ १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी
4. ✅ सेवानिवृत्तीचे वय 60 करा
5. ✅ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान न्याय व वेतन संरचना द्यावी
6. ✅ कंत्राटी, तात्पुरत्या व अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे
7. ✅ सेवाशर्ती स्पष्ट करून पदोन्नती, वेतनवाढ व सेवा संरक्षण सुनिश्चित करावे
8. ✅ आरोग्य विमा व सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात
9. ✅ निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ तातडीने लागू करावेत
10. ✅ प्रलंबित आर्थिक व प्रशासकीय प्रश्न तत्काळ निकाली काढावेत
11. ✅ रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने भरती करावी

12. ✅ शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
13. ✅ अन्यायकारक निर्णय व धोरणांवर पुनर्विचार करून सुधारित शासन निर्णय जारी करावेत

✊ घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र

तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी
“आमच्या मागण्या मान्य करा!”,
“शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा, विजय असो!”
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की,
👉 “मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.”

👥 उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी

    या आंदोलनात युनिट प्रमुख दिलीप कुमरे यांच्या नेतृत्वाखाली संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, दयानंद मागाडे, संदीप फडतरे, अमरसिंह घोरपडे, किरण जाधव, स्वाती निंबाळकर, फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक-निंबाळकर, आशालता बनकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार, बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार , पोपट डांगे, प्रताप चव्हाण, दादा जावळे, दत्तात्रय बनकर, परमेश्वर लिपारे, हनुमंत वालकोळी , अनिल वाजे , लहू चव्हाण , दीपक रणदिवे, जगदीश बोराटे , योगेश आडके आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚠️ शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा – मागणी

या संपामुळे शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

✍️ — ॲड. राजू भोसले
संपादक, साप्ताहिक झुंजार भारत (सातारा)




महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर, मुधोजी महाविद्यालय येथील कर्मचारी संपात सहभागी….

फलटण प्रतिनिधी:

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर,

📌 राज्यभरातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता; विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम,

मुधोजी महाविद्यालय येथील कर्मचारी संपात सहभागी… निवेदन सादर.

फलटण प्रतिनिधी:   महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे.
                      या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील मुधोजी महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे निवेदन कॉलेज कर्मचारी युनियनचे युनिट प्रमुख दिलीप कुमरे व इतर प्रमुख कर्मचारी यांनी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांना निवेदन दिले. यावेळी संजय कामठे, ॲड. राजू भोसले, शिवाजी बुधावले, संदीप टिळेकर, संदीप फडतरे अमरसिंह घोरपडे, किरण जाधव, कॉलेज एलमसी सदस्य फातिमा तांबोळी, कौसल्या रणदिवे, शुभांगी नाईक निंबाळकर, अमरीन खान, माधुरी कुंभार, लता कुंभार , बकुळा सावंत, महेश कदम, महादेव सूळ, विक्की गायकवाड, सुभाष शेवाळे, संजय सोनार हे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

📢 शासनाच्या दुर्लक्षामुळे संपाचा निर्णय

समन्वय समितीने मागील १५ महिन्यांत सात वेळा लक्षवेधी आंदोलने करूनही शासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांची भेटही मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विधानसभेत मान्य झालेल्या मागण्यांवरही कार्यवाही न झाल्याने अखेर नाईलाजास्तव बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

📚 परीक्षांवर होणार परिणाम
सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून, या संपामुळे परीक्षा व प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर त्याचे परिणाम जाणवू शकतात.

📌 प्रमुख प्रलंबित मागण्या

1. जुनी पेन्शन योजना लागू करावी
(१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी)

2. रिक्त पदे तातडीने भरावीत
चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी

3. १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी

📣 शासनाने तातडीने दखल घ्यावी.

या संपामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.

✍️ — 📰 ॲड. राजू भोसले, संपादक – झुंजार भारत (सातारा)
दिनांक: 21 एप्रिल 2026 |




मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

 

फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रशासकिय कर्मचारी तसेच प्राध्यापकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान अटीतटीच्या आणि रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रा. डॉ. योगेश माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विक्की गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांचे महाविद्यालय प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये मध्ये क्रीडाभावना व स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




मुधोजी महाविद्यालयात अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न


फलटण : विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच मतदानाचे महत्त्व समजावे या उद्देशाने फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत “अभिरूप निवडणूक प्रक्रिया (Mock Electoral Process)” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाशाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले असून हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांना प्रा. प्रियांका शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विद्या शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३६ विद्यार्थ्यांनी व १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १०.०० वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत एकूण ६२६ मते पडली. त्यापैकी १६ मते बाद झाली, तर १३ मते NOTA ला मिळाली. निकालानुसार बी.ए. भाग दोनची विद्यार्थिनी तनुजा कुमकाले हिने २८१ मते मिळवून ११९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर बी.ए. भाग एकचा विद्यार्थी आदित्य रणदिवे याला १५६ मते, तर बी.ए. भाग तीनचा विद्यार्थी विनय शिंदे याला १६२ मते मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेत धीरज जाधव यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच शिवाजंली रणदिवे (पहिले मतदान अधिकारी), श्रुतिका कदम (दुसरे मतदान अधिकारी) आणि पायल जाधव (तिसरे मतदान अधिकारी) यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीतील मतदान प्रक्रिया, गुप्त मतदान प्रणाली, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी –  प्रा. श्रेयस कांबळे

 

 

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे.-प्रा. श्रेयस कांबळे

मराठी भाषेतील साहित्यिक यांचे कार्य उत्तम असून त्यांचे साहित्य हे दिशादर्शक व प्रेरणादाय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे असे मत फलटण येथील विधी महाविद्यालयाचे प्रा. श्रेयस कांबळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे मराठी भाषा गौरव दिन वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.

मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संत पंथ थोर युगपुरुष साहित्यिक कवी लेखक यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी सरळ सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या आहे.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे, विद्या जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेयस कांबळे पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे.

चक्रधर स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच अनेक थोर संत यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीने व लेखणीने मोठे योगदान दिले आहे. ही मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे त्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाले अतिक्रमणे झाली तरी मराठी भाषा आजही जशीच्या तशी ताट मानेने उभी आहे.

मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व इतर भाषेतील शब्द वापरणे टाळणे काळाची गरज आहे.

थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे मातृभाषा टिकली तरच आपल्या अस्तित्व टिकेल त्यामुळे माय मराठी ला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे.

यावेळी सौ जाधव एम.डी. उपशिक्षक गायकवाड ए. आय. तसेच विद्यार्थीनी तनया जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवलकर ए. ए. यांनी केले तर आभार कु. हन्नूरे एस.एम. यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.